संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 29 March 2023

त्र्यंबकेश्वर रोडवरील कॉलेजच्या आवारात २ गटांत तुंबळ हाणामारी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप फाऊंडेशनच्या फार्मसी महाविद्यालयाच्या गेटवर विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. त्यात एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो जबर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी त्रंबकेश्वर ठाण्याच्या पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हा नोंदवला आहे.
त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप फाऊंडेशनच्या फार्मसी कॉलेजमध्ये वारंवार विद्यार्थ्यांच्या हाणामारीच्या घटना घडतात. अशीच घटना तेथे पुन्हा घडली. कॉलेजच्या गेटवर विद्यार्थ्यांच्या दोन गटांत क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात जोरदार हाणामारी झाली. कॉलेजच्या बाऊन्सरसमोर ही घटना घडली. यात एक विद्यार्थी जबर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे येथे बाहेरून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या