संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

‘थँक गॉड’ विरोधातील याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- अभिनेता अजय देवगणच्या 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेल्या ‘थँक गॉड’ चित्रपटात भगवान चित्रगुप्त यांना चुकीच्या पध्दतीने दाखविण्यात आले असल्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी आता 31 ऑक्टोबरला किंवा 1 नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
श्री चित्रगुप्त वेल्फेअर ट्रस्ट नावाच्या संस्थेने ही याचिका दाखल केली होती. या याचिकेत म्हटले होते की, चित्रपटाच्या ट्रेलरवरुन हे स्पष्ट होते की, चित्रगुप्त यांना अपमानास्पद पध्दतीने दाखविण्यात आले आहे आणि त्यांची खिल्ली उडविण्यात आली आहे. यामुळे भगवान चित्रगुप्‍ताची पुजा करणार्‍या जगभरातील करोडो कायस्थ लोकांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. या चित्रपटाला प्रदर्शित करु नका अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या याचिकेवर आज तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. दरम्यान, या चित्रपटात अजय देवगण याने चित्रगुप्ताची भुमिका साकारली आहे. चित्रपटात सिध्दार्थ मल्होत्रा आणि रकुलप्रीत सिंग यांच्याही महत्वाच्या भुमिका आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami