बँकॉक : थायलंडची राजकुमारी बज्रकितियाभा नरेंद्ररा देव्यावती यांना हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. रॉयल पॅलेसने ही माहिती दिली आहे. 44 वर्षीय राजकुमारी बज्रकितियाभाला बुधवारी पहाटे बेशुद्ध पडल्यानंतर ईशान्य नाखोन रत्चासिमा प्रांतातील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राजवाड्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने बँकॉकला नेण्यात आले. राजकन्या ही राजा वजिरालोंगकॉर्नच्या तीन मुलांपैकी एक आहे. खाओ याई नॅशनल पार्कमध्ये धावत असताना राजकुमारी अचानकपणे पडली.तिला तासाभराहून अधिक काळ सीपीआर देण्यात आला पण राजकुमारीला त्याचा फारसा फायदा झाला नाही. त्यानंतर तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र आता तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.