संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

थोरात कारखाना उसाला 2,626 रुपये भाव देणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अहमदनगर- अहमदनगरच्या संगमनेरातील अमृतनगर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या 56 व्या ऊस गळीत हंगामाचा सुभारंभ सोहळा पार पडला असून यंदाही सर्वाधिक भाव देण्याची परंपरा थोरात साखर कारखान्याने कायम राखली. कारखान्याने गेल्या वर्षी कार्यक्षेत्रात ऊसउत्पादकांना 2,450 रुपये प्रतिटन भाव दिला होता. यंदा 176 रुपये प्रतिटन वाढ करून 2,626 रुपये उसाला भाव देणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आणि बाळासाहेब थोरात यांनी केली.
पुढे थोरात म्हणाले की, 56 वर्षांपूर्वी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी काटकसरीने सुरू केलेल्या या साखर कारखान्याची घडी सर्वांनी जपली. गेल्यावर्षी साखर कारखान्याने 15 लाख 53 हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले. यात सर्वांचे योगदान आहे, हे नाकारून चालणार नाही. निळवंडे कालव्यांची कामे पूर्णत्वास आली आहेत. या दिवाळी पाडव्याला कालव्यांना पाणी सोडण्याचे स्वप्न होते. मात्र, सरकार बदलले. त्यामुळे थोडावेळ लागेल, पण आता निळवंडेचे पाणी कोणीही अडवू शकणार नाही, असे थोरात म्हणाले. गेल्या वर्षी 10 लाख 80 हजार क्विंटल साखर निर्यात केली. 1 लाख टन साखर विक्रीस सज्ज आहे. मात्र, केंद्र सरकारने साखरेला प्रतिक्विंटल 3500 रुपये भाव देणे गरजेचे आहे, परंतु अजूनही साखरेला 3100 चाच भाव मिळत असल्याचे थोरात म्हणाले. थोरात कारखान्याला मिळालेला केंद्रस्तरावरील पुरस्कार स्वीकारण्यास अध्यक्ष प्रतापराव ओहोळ हे शिर्डीवरून दिल्लीला विमानाने गेले अन्‌‍‍ आलेसुद्धा विमानानेच, मात्र त्यांचे वजन जास्त असल्यामुळे विमान उतरण्यास अनेक अडचणी आल्या अन्‌‍‍ ते विमान थेट मुंबईला उतरले, असे आपल्या कारखान्याचे वजनदार अध्यक्ष आहे, त्यांचे कामगिरीही वजनदार आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणताच हशा पिकला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami