संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

दरमहा 210 रुपये भरा, निवृत्तीनंतर 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळवा!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पूर्वी केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच निवृत्ती वेतनाची सोय होती. मात्र आता खाजगी नोकरदारांनाही पेन्शन मिळवता येते. यासाठी केंद्र सरकारची ‘अटल पेन्शन योजना’ लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

अटल पेन्शन योजनेंतर्गत वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शन मिळते. ही पेन्शन मिळवण्यासाठी ग्राहकाला 42 ते 210 रुपये दरमहा द्यावे लागतात. यामध्ये 18 वर्षे ते 40 वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक करू शकतात. निवृत्तीनंतर तुम्हाला किती पेन्शन हवी आहे यावर किती रक्कम कापली जाईल हे अवलंबून असते. जर एखाद्या ग्राहकाने वयाच्या 40व्या वर्षी ही योजना घेतली तर त्याला 291 रुपये ते 1454 रुपये प्रति महिना मासिक योगदान द्यावे लागते. ग्राहक जितका जास्त योगदान देईल तितकी जास्त निवृत्तीनंतर त्याला पेन्शन मिळते.

या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक किंवा अर्ध-वार्षिक म्हणजेच 6 महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूक करू शकतात. योगदान ऑटो-डेबिट केले जाईल. म्हणजेच निश्चित रक्कम तुमच्या खात्यातून आपोआप कापली जाईल आणि तुमच्या पेन्शन खात्यात जमा होईल. या योजनेत सामील होण्यासाठी बचत बँक खाते, आधार आणि सक्रिय मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. तुमचे SBI मध्ये खाते असल्यास तुम्ही नेट बँकिंगद्वारे या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami