संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

दसरा मेळावाबाबत संभ्रम ठेवू नका! उद्धव ठाकरेंचा उपशाखाप्रमुखांना सल्ला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज शिवसेना भवनात उपशाखाप्रमुखांची बोलावली होती. त्यात त्यांनी त्यांच्यासोबत दसरा मेळावा आणि 21 सप्टेंबर रोजी गोरेगावात होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याबाबत याबैठकीत चर्चा केली. आपला दसरा मेळावा हा शिवतिर्थावरच होणार आहेत. कोणताही संभ्रम ठेवू नका, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. त्यांच्याकडे प्रकल्प गेला, पण राज्य सरकार त्यावेळी काय करत होते? दोन महिन्यांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? वेदांता आणि फॉक्सकॉन सारख्या कंपन्या राज्याबाहेर गेल्यामुळे राज्याचे नुकसान झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी याचे आत्मपरीक्षण करावे. यंदाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार. त्याबद्दल कोणताही संभ्रम ठेवू नका. त्यासाठी मुंबई महापालिकेमध्ये रिमांइंडर अर्जही देण्यात आला असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. ही बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना शाखाप्रमुख मंगेश सातमकर यांनी सांगितले की, आजच्या बैठकीत शिवतिर्थावरील दसरा मेळावा आणि गोरेगावमध्ये होणाऱ्या मेळावाबाबत चर्चा झाली. दोन्ही मेळावे केसे यशस्वी करण्याचा हा निर्धार आमचा झाला. त्यासाठी गर्दी आणि योजना कसे करता येईल. याबाबींवर चर्चा झाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami