संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

दसऱ्याच्या बंदोबस्ताला निघालेल्या पोलिसाचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

परभणी : दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. यासाठी परभणी रेल्वे स्थानकातून दसऱ्याच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली .या पोलिस कर्मचाऱ्याचा चालत्या रेल्वे गाडीत चढताना तोल गेल्याने पाय घसरून रेल्वेखाली सापडल्याने मृत्यू झाला. ही घटना परभणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

दत्ताराम घाग हे परभणी पोलीस दलातील आरसीपी प्लाटून एकमध्ये कार्यरत होते. दसऱ्याच्या दिवशी त्यांचा मानवत येथे पोलीस बंदोबस्त लागला. या बंदोबस्ताला जाण्यासाठी पोलीस कर्मचारी दत्ताराम घाग हे बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास परभणी स्थानकावर आले. हैदराबाद येथून औरंगाबादकडे जाणारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म दोनवर उभी होती. ही रेल्वे निघताना दत्ताराम घाग हे चालत्या गाडीत चढत होते. त्यावेळी त्यांचा तोल गेला. यात ते रेल्वेखाली सापडले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलीस जीआरपी आणि आरपीएफ यांनी स्थानकातील घटनास्थळी धाव घेतली. दसऱ्याच्या दिवशी बंदोबस्ताला निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूने पोलीस कुटुंबावर तसेच जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami