संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

दहावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून ऑनलाईन हॉल तिकीट मिळणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहेत. त्यात बारावीची परीक्षा ४ मार्चपासून आणि दहावीची परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉल टिकीट उद्या १८ फेब्रुवारीला दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन बोर्डाच्या संकेतस्थळावर मिळणार आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी उद्या १८ फेब्रुवारीपासून ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांनी शाळेकडून ऑनलाइन हॉल टिकीट प्रिंट करून त्यावर मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का घ्यावा. त्यात काही तांत्रिक अडचण आल्यास विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे. १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami