मुंबई – राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी होम सेंटर असणार नाही.तसेच कोरोनामुळे मागच्या वर्षीच्या दिलेला ३० मिनिटांचा वाढीव वेळही रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच पेपर लिहावा लागणार आहे.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदापासून त्यांच्या शाळेतच त्यांचे परीक्षा केंद्र मिळणार नाही, तसेच कोरोना काळात जो ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जात होता,तो देखील रद्द करण्यात आला आहे. कोरोनापूर्व नियमावली लागू करण्यात येणार असून पूर्वीप्रमाणेच नियम असणार आहेत. कोरोना काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या होम सेंटर्सची म्हणजेच ते शिकत असलेल्या शाळेतच परीक्षेची सुविधा आणि ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ सुरू करण्यात आला.आता कोरोनाचा फार मोठा धोका नसल्यामुळे आम्ही जुने नियम परत आणत आहोत,असे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी म्हटले आहे.