संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

दाक्षिणात्य ज्येष्ठ अभिनेते कृष्णम राजू यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

हैदराबाद- माजी केंद्रीय मंत्री आणि दिग्गज अभिनेते उप्पलपति कृष्णम राजू यांचे आज पहाटे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली आहेत. रिबेल स्टार म्हणून ओळखले जाणारे कृष्णम राजू बाहुबलीतील प्रमुख अभिनेता प्रभासचे चुलते होते. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककाळा पसरली आहे.
कृष्णम राजू यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्टला त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना निमोनिया झाला. ११ सप्टेंबरला त्यांची प्रकृती गंभीर बनली. शेवटी आज पहाटे ३.१६ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजू यांनी १८० चित्रपटांमध्ये काम केले होते. १९६६ मध्ये तेलगू चित्रपटातून त्यांची कारकीर्द सुरू झाली. दक्षिणेतील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये काम केले होते. ते दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami