मुंबई- आश्रय योजनेतंर्गत पुनर्विकास करण्यासाठी दादर पूर्वच्या महापालिका वसाहत गौतम नगर येथे राहत असलेल्या सफाई कामगारांना खोल्या खाली करण्याची जाहीर नोटीस देण्यात आली असून या कामगारांच्या वेतनात विस्थापन भत्ता 14 हजार आणि घरभाडे भत्ता देण्यात येणार आहे.
याबाबत महापालिकेचे उप आयुक्त ( घवक्य) यांनी ही वसाहत 31 डिंसेबरपर्यंत खाली करण्याचे आदेश दिले आहेत. या नोटिशीत म्हटले आहे की, ‘निवासस्थानाचा विद्युत देयकाचा भरणा करुन निवासस्थान 31 डिंसेंबरपर्यंत रिक्त करण्यात यावे, तसेच या कार्यालयास लेखी कळविण्यात यावे, जेणेकरुन नियोजित पुनर्विकास कामास सुरुवात करण्यात येईल.तसेच वसाहतीमधील वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा 31 डिंसेंबरपासून खंडीत करण्यात येणार आहे, असे महापालिकेने आपल्या जाहीर नोटिशीत सांगितले आहे.