संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

दादर रेल्वे स्थानकावर सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानक दादर येथे सिग्नलमध्ये आज सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक आणि लांब पल्ल्यांच्या गाड्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. काही वेळात मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सिग्नलमधील बिघाड आता दूर करण्यात आला. त्यामुळे लोकल वाहतूक सेवा ही 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होत्या.
आज सकाळी आठच्या सुमारास सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुळे उपनगर दिशेला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेला जाणाऱ्या लोकलचा खोळंबा झाला होता. सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या अनेक स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली.त्यामुळे सकाळच्या वेळी कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहचायला देखील उशीर झाला. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या रेल्वे रुळावर रखडल्या होता. मात्र, सिग्नलमधील बिघाड दूर केल्यानंतर रेल्वे वाहतूक सेवा पुर्वपदावर करण्यात आली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami