संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

दापोलीतील एकाच घरात आढळले तीन महिलांचे अर्धवट जळालेले मृतदेह

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

दापोली – तालुक्यातील दापोली – पालगड मार्गावरील वणोशी खोतवाडी गावातील एकाच घरातील तीन वृद्ध महिलांचा अर्थवट जळालेल्या अवस्थेत संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना काल मकर संक्रातीदिवशी उघडकीस आली. एकाच घरात तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तिघींचे जळके मृतदेह आढळले असून असून तिघींच्या डोक्यांना गंभीर जखम होऊन मोठा रक्तस्त्राव झाल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे या तिन्ही मृत्यूंबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

या थरारक घटनेतील मृत महिलांची नावे – सत्यवती पाटणे ( ७५), पार्वती पाटणे (९०) व इंदुबाई पाटणे ( ८५) अशी आहेत. वणोशी खोतवाडी येथे राहणाऱ्या या तिन्ही महिलांचे नातेवाईक मुंबईत वास्तव्यास असल्याने त्या एकमेकांच्या आधाराने राहत होत्या.सध्या थंडीचे दिवस असल्याने या महिला रोज सकाळी घराबाहेर उन्हामध्ये बसायच्या.त्यांच्या घराबाहेर कुदैवताचे मंदिर आहे.तिथेच राहणारे विनायक पाटणे हे दररोज या मंदिरात पूजेसाठी येत असतात. कालही ते तिथे आले असता मंदिराची चावी मागण्यासाठी त्या महिलांच्या घरी गेले असता त्यांना भयंकर प्रकार दिसला.त्यांनी लगेच इतर ग्रामस्थांना आणि पोलिसांना बोलावले. त्यावेळी या तिन्ही महिला वेगवेगळ्या खोलीत अर्धवट जळालेल्या आणि डोक्याला जखम झालेल्या अवस्थेत आढळून आल्या.विशेष म्हणजे त्यांच्या घराचे पुढील दार बंद तर पाठीमागील दार उघड होते.त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami