संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

दाबोळी विमानतळ बंद होणार नाही खासदार सार्दिन यांचे स्पष्टीकरण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वास्को- मोपा विमानतळ सुरू होऊन दाभोळी विमानतळ बंद होणार असल्याच्या अफवा पसरल्याने दक्षिण गोव्यातील व्यावसायिक चिंतेत आहेत.मात्र कुणीही चिंता करू नये.दाबोळी विमानतळ कदापि बंद पडणार नाही,असे स्पष्टीकरण दक्षिण गोव्याचे खासदार आणि दाबोळी विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष फ्रान्सिस्को सार्दिन यांनी दिले आहे.सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीनंतर खासदार सार्दिन हे पत्रकारांशी बोलत होते.
दाबोळी विमानतळाच्या परिषद कक्षात काल सल्लागार समितीची पहिली बैठक पार पडली.या बैठकीत उद्योजक नाना बांदेकर,अतुल जाधव शरद चोपडेकर यांनी आपले विचार मांडले.यावेळी दाबोळी विमानतळ प्राधिकरणचे संचालक एस.व्ही.धनंजय राव आणि समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार फ्रान्सिस्को सार्दिन म्हणाले की,कोणत्याही परिस्थितीत दाबोळी विमानतळ बंद होणार नाही.ते सुरूच राहील असे आश्वासन सरकारने दिले आहे.त्यामुळे कुणीही त्याबद्दल चिंता करू नये.
गोव्यामध्ये मोपा आणि दाबोळी या दोन्ही विमानतळांची गरज आहे.जी मोठी विमाने दाबोळी विमानतळावर उतरणार नसतील ती मोपा विमानतळावर उतरतील.
दाबोळी विमानतळावरील पार्कींगसंबंधी सविस्तर चर्चा झाली असून ही समस्या पुढील काही महिन्यात निश्चित दूर करण्याचे आश्वासन संबंधीतानी दिले असल्याचे खासदार सार्दिन यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami