संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

दासगाव खिंडीत भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव खिंडीत कारने आराम बसला समोरुन जोरदार धडक दिल्याची घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात तीनजण जागीच ठार झाले, तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चुराडा झाला.

अपघातातील संदीप पाटील असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. इतर दोन जणांची नावे अद्याप कळलेली नाहीत. जखमींना महाड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर दोन्ही वाहने बाजूला करण्यात आली होती. मुंबई-गोवा महमार्गावर बलेनो कारने दीपक पाटील हा चालक पाच जणांना घेऊन भरधाव वेगाने कल्याणकडे निघाला होता. मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास कार महाड दासगाव खिंडीत आली. येथे समोरुन येणाऱ्या बसला कारने जोरदार धडक दिली. याप्रकरणी चालकाविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami