संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 07 December 2022

दिनविशेष : आज आंतरराष्ट्रीय चहा दिन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चहाचे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने २१ मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यात संयुक्त राष्ट्रसंघाची अन्न आणि कृषी संघटना (एफएओ) पुढाकार घेणार आहे. २१ मे २०२० हा पहिला आंतरराष्ट्रीय चहा दिवस ठरला होता.

भारत, श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, मलेशिया अशा काही चहा उत्पादक देशांमध्ये २००५ पासून १५ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जात होता. आता मात्र संयुक्त राष्ट्रसंघाने पुढाकार घेऊन ठरवल्यामुळे चहाचे महत्त्व अधिक अधोरेखित होईल आणि तो २१ मे रोजी साजरा केला जात आहे. जगभर प्रिय असलेल्या चहाचे सेलिब्रेशन व्हावे यासाठी २००५ पासून १५ डिसेंबर हा ‘जागतिक चहा दिवस’ म्हणून श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, व्हिएतनाम, केनिया, मलावी, मलेशिया, युगांडा, भारत आणि टांझानिया येथे साजरा होत असे. हा साजरा करण्यामागचा हेतू असा की, जागतिक चहा व्यापाऱ्यांचे कामगारांवर आणि उत्पादकांकडे लक्ष केंद्रित व्हावे. आता मात्र संयुक्त राष्ट्रसंघाने पुढाकार घेऊन ठरवल्यामुळे चहाचे महत्त्व अधिक अधोरेखित होईल आणि तो दर वर्षी २१ मे रोजी साजरा केला जाईल.

पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा… भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांगला देश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते. चहाला जगभर पार्टीचं स्वरूप आलेलं आहे. चीनमध्ये ‘गॉमफाय’ टी सेरीमनी असते. मुद्दाम मातीच्या भांड्यात चहा देतात. त्याला थिक्सिंग टी पॉट म्हणतात. आजही आपल्या वधू-वर संशोधनाच्या वेळेस वाफाळलेला चहा आणि पोहे पार्टी असते. जपानमध्ये चहा सादर करणे ही कला आहे. आज जागतिक चहा दिनाच्या निमित्तानं जगभरातील टी आणि कॉफी हाऊसेसमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं.
चहा हे थंड पेयदेखील आहे. थंड चहाचे पण अनेक प्रकार आहेत. लेमन, ऑरेंज, पायनापल, स्ट्रॉबेरी, विड्याच्या पानांचा रस घालून थंड चहा करता येतो. ग्रीन टी हे आजकाल हेल्थ ड्रिंक म्हणून खूप प्रसिद्ध झालं आहे. ग्रीन टी हे एक नैसर्गिक फॅट बर्नर असून त्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात.

चहाची कथा

चहाबद्दल असे सांगितले जाते की पाच हजार वर्षांपूर्वी ‘शेननंग’ नावाचा चिनी राजा होऊन गेला. तो प्रयोगशील, दूरदृष्टी असलेला, कलेचा भोक्ता होता. त्या राजाच्या राज्याचा विस्तार खूप मोठा होता. आपल्या राज्यातील दूरच्या ठिकाणी जाऊन प्रजेची हालहवाल विचारावी म्हणून त्याच्या लवाजम्यासकट निघाला. एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबला. राजाने नोकरांना पाणी उकळण्यास सांगितले. पाणी उकळायला ठेवले त्या वेळेस काही वाळलेली पाने उकळत्या पाण्यात पडली आणि पाणी करड्या रंगाचे झाले. राजा संशोधनवृत्तीचा असल्यामुळे तो ते पाणी प्यायला. त्याला खूप तरतरी आली. हाच जगातील पहिला चहा आहे असे मानले जाते.

– संजीव वेलणकर
९४२२३०१७३३

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami