दिनविशेष! पत्नी, मुलगी, मुलगा यांच्या निधनानंतरही न डगमगलेला नेता ‘जो बायडेन’

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा वाढदिवस.
त्यांचा जन्म २० नोव्हेंबर १९४२ पेन्सिल्वेनिया
च्या स्क्रँटन येथे झाला.
व्हाइट हाऊसमधील राजकारणाचा तब्बल ४६वर्षे अनुभव असलेले आणि दोनदा अमेरिकेचे उपराष्ट्रपती राहिलेले जो बायडन हे अनेक कारणांनी प्रसिद्धही आहेत आणि वादग्रस्तही ठरलेले आहेत. जो बायडन अर्थात जोसेफ रॉबिनेट बायडेन ज्युनिअर यांचा जन्म पेन्सिलवेनिया येथे झाला. लहानपणीच त्यांचे कुटुंबीय डेलवेअरला राह्यला आले होते. त्यांना कौटुंबिक जीवनात अनेक चढ-उतार पाहावे लागले. त्यांची पहिली पत्नी निलीया आणि मुलगी नाओमी यांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर वयाच्या ४६ व्या वर्षी मुलगा ब्यू याचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. मात्र, कौटुंबिक संकट आल्यानंतरही अमेरिकन राजकारणात ठामपणे उभा राहिलेला हा योद्धा तसूभरही डगमगला नाही.
जो बायडन हे डेलवेअरमधून सहा वेळा सिनेटर म्हणून निवडून आले आहेत. १९७२ मध्ये निवडून आलेले ते सर्वात तरूण सिनेटर होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची त्यांची ही तिसरी निवडणूक आहे. १९८८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभं राहण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वाङमय चोरीच्या आरोपमुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. दुसऱ्यांदा त्यांनी २००८ मध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रयत्न केला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून जो बायडन यांना ओळखलं जातं. ओबामांच्या कार्यकाळात ते २००८ आणि २०१६ मध्ये दोनदा उपराष्ट्रपती होते. यंदाच्या निवडणुकीत जो बायडन विजयी व्हावेत म्हणून स्वत: बराक ओबामा यांनी बराच प्रयत्न केला. जो बायडन अनेकदा वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्यावर वाङमय चौर्याचाही आरोप झाला होता आणि तो त्यांनी मान्यही केला होता.

लॉ स्कूलमध्ये पहिल्याच वर्षी कायद्याच्या समीक्षेचा लेख चोरल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. ब्रिटीश लेबर पार्टीचे नेते नील किन्नॉक यांच्या भाषणाचीही त्यांनी चोरी केली होती. तसेच सीनेट कार्यालयात काम करणाऱ्या एका महिलेचा विनयभंग केल्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. जो बायडन अनेक वादात अडकले असले तरी अभ्यासू नेता म्हणून ते सर्वपरिचित आहेत. वॉशिंग्टन डीसीमधला अनेक वर्षांचा अनुभव असलेले नेते, उत्तम प्रशासक, परराष्ट्र धोरणाचा गाढा अभ्यासक, कुशल वक्ता आणि भावनिक नेता म्हणून त्यांची ख्याती आहे.
जो बायडन यांना भारताचे हितचिंतक म्हणूनही पाहिले जाते. भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय-अमेरिकन जनसमुदायाशी संबोधित करताना राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यास भारतासमोरील आव्हाने दूर करण्यासाठी भारताला साथ देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. भारत आणि अमेरिकेदरम्यान असैन्य अण्विक कराराला मंजुरी मिळावी म्हणून गेल्या पंधरा वर्षांपासून आपण प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे जो बायडन यांच्याकडून भारताच्याही खूप अपेक्षा आहेत.

संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३

Close Bitnami banner
Bitnami