संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

दिनविशेष! पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाचे खंदे पुरस्कर्ते डॉ. हर्षवर्धन

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

भाजपचे ज्येष्ठ नेते व भारताचे माजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन गोयल यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म १३ डिसेंबर १९५४ रोजी झाला.

दिल्लीत कान-नाक-घसा तज्ज्ञ म्हणून काम करणारे डॉ. हर्षवर्धन गोयल सुरुवातीला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या कार्यात उतरले. मूळचे दिल्लीचे आणि रा. स्व. संघाच्या मुशीतील ओमप्रकाश गोयल यांचे पुत्र असलेले हर्षवर्धन पुढे भाजपमध्येही कार्यरत झाले. हर्षवर्धन यांचे शिक्षण दर्यागंज येथील अँग्लो संस्कृत व्हिक्टोरिया ज्युबिली वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात झाले. कानपूरच्या गणेश शंकर विद्यार्थी मेमोरियल मेडिकल कॉलेजमधून त्यांनी वैद्यकीय विज्ञान आणि शस्त्रक्रिया या विषयात पदवी प्राप्त केली आणि याच महाविद्यालयातून त्यांनी ऑटोलॅरॅंगोलॉजी विषयात निपुणता मिळविली. हर्षवर्धन लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य राहिले आहेत.

भाजपची ‘डॉक्टर विंग’ स्थापण्यात त्यांचा पुढाकार होता. दिल्लीत मदनलाल खुराणा व नंतर सुषमा स्वराज यांचे सरकार होते तेव्हा हर्षवर्धन यांनी या दिल्लीचे आरोग्य मंत्रिपद सांभाळले होते. १९९३ मध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर दिल्लीच्या कृष्णा नगर मतदारसंघातून निवडून आले आणि ते दिल्लीच्या पहिल्या विधानसभेचे सदस्य झाले. दिल्ली सरकारमध्ये त्यांनी कायदा आणि आरोग्य मंत्री म्हणून काम केले. ते १९९६ मध्ये शिक्षणमंत्री झाले. दिल्ली राज्य आरोग्य मंत्रालयात त्यांनी ऑक्टोबर १९९४ मध्ये पोलिओ निर्मूलन योजना सुरू केली. त्यांचा हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि त्यानंतर भारत सरकारने हा कार्यक्रम देशभर राबविला. याची दखल घेऊन त्यांना १९९८ मध्ये डब्ल्यूएचओतर्फे प्रतिष्ठेचे ‘महासंचालक पदक’देखील मिळाले होते. डब्ल्यूएचओच्या कार्यकारी मंडळ अध्यक्ष म्हणून सध्या काम बघत होते. त्यांनी ‘अ टेल ऑफ टू ड्रॉप्स’ नावाचे पुस्तक लिहिले आहे,ज्यात त्यांनी पोलियो निर्मुलन कार्यक्रमा बाबत लिहिले आहे.

संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami