दिनविशेष : माजी मिस इंडिया स्वरूप संपत

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

आज अभिनेत्री व माजी मिस इंडिया स्वरूप संपत यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९५८ रोजीचा १९७९ मध्ये स्वरुप संपत यांनी मिस इंडिया कॉम्पिटीशनमध्ये भाग घेतला आणि हा किताब आपल्या नावे केला. त्याच वर्षी त्यांनी मिस युनिव्हर्स स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

स्वरूप संपत यांनी टीव्ही कॉमेडी शो ‘ये जो है जिंदगी’ मध्ये काम केले, हा शो खुप हिट ठरला. १९८४ मध्ये ‘करिश्मा’ या चित्रपटात त्यांनी काम केले. यात त्या कमल हासन आणि रीना रॉय यांच्यासोबत दिसल्या. ‘करिष्मा’ चित्रपटांत त्यांनी बिकनी घालून त्यांनी खळबळ निर्माण केली होती. या पश्चात नरम गरम, हिम्मतवाला, साथिया, सप्तपदी, की अँड का अशा सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. यासोबतच त्यांनी कुंकू तयार करणाऱ्या श्रृंगार कंपनीसाठी मॉडलिंग केली आहे. हिम्मतवाला या चित्रटानंतर स्वरूप यांनी इंडस्ट्रीतून काहीसे अलिप्त होत समाजसेवेत स्वत:ला झोकून दिले. अनेक पुस्तकेही त्यांनी लिहिली. २०१८ मध्ये त्यांनी ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ सिनेमात छोटेखानी भूमिका साकारली. याआधी स्वरुप यांनी ‘की और का’ सिनेमात करिना कपूरच्या आईची भूमिका साकारली होती. एक उत्कृष्ट अभिनेत्री असूनही स्वरूप संपत या गुजरातमधील एका प्राथमिक शाळेत मुलांना शिकवतात. स्वरूप यांचं नाव Varkey Foundation च्या Global Teacher Prize च्या नामांकनासाठी निवडण्यात आलं होते. जगभरात फक्त १० लोकांच्या नावाची निवड या पुरस्कारासाठी होते. स्वरुप संपत यांच्या नावाची यावेळी निवड करण्यात आली होती. शिकवणीच्या कलात्मक पद्धतीसाठी स्वरुप संपत यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. आपल्या शिकवणीतून त्या समाजातील वेगवेगळ्या स्थरातील लोकांना शिक्षित करण्याचं काम त्या करतात. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी स्वरूप संपत यांनी मुलांसाठी होणाऱ्या एज्युकेशन प्रोग्रामचे हेड म्हणून सिलेक्ट केले होते. स्वरूप संपत या अभिनेते परेश रावल यांची पत्नी.

परेश आणि स्वरूप पहिल्यांदा १९७५ मध्ये एकमेकांना भेटले होते. दोघेही तेव्हा कॉलेजात शिकत होते. स्वरूप यांना पहिल्यांदा पाहताच परेश त्यांच्या प्रेमात पडले होते. स्वरूप यांना पहिल्यांदा पाहिल्यानंतर मी याच मुलीशी लग्न करणार, असे परेश आपल्या एका मित्राला म्हणाले होते. पण यानंतर एक वर्ष परेश स्वरूप यांच्याही साधे बोललेही नव्हते. याचदरम्यान स्वरूप यांनी एकदा परेश यांना स्टेज परफॉर्मन्स देताना प्रथम पाहिले आणि त्या परेश यांच्या फॅन बनल्या. बॅक स्टेजवर जात त्यांनी तू कोण? असा थेट प्रश्न परेश यांना केला. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि नंतर प्रेम. मुंबईच्या लक्ष्मीनारायण मंदिरात दोघांचे लग्न झाले. मंडपाऐवजी दोघांनीही एका मोठ्या झाडाखाली लग्नाच्या आणाभाका घेतल्या. परेश रावल आणि स्वरूप या दाम्पत्याला दोन मुले आहेत. आदित्य आणि अनिरुद्ध ही त्यांच्या मुलांची नावे आहेत.

  • – संजीव वेलणकर
    ९४२२३०१७३३
Close Bitnami banner
Bitnami