आज अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरचा वाढदिवस. त्यांचा जन्म १९ जून १९९७ पुणे येथे झाला. प्रियदर्शनीने आपले शालेय शिक्षण रेणुका स्वरूप हायस्कूलमधून पूर्ण केलेले आहे, तसेच तिने आपले कॉलेजचे शिक्षण पीवीजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अॅड टेक्नोलॉजी, पुणेमधून पूर्ण केलेले आहे. शाळेत असल्यापासूनच अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांना अभिनयाची आणि नृत्याची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्या कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेत असत. अभिनेत्री प्रियदर्शनीने आपल्या अभिनय करीयरची सुरुवात मराठी नाटकांपासून केलेली आहे.
अभिनेत्री प्रियदर्शनी यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात ‘मौनांतर’ या मराठी नाटकापासूनपासून केली आहे. या मराठी नाटकासाठी त्यांना दृतीय क्रमांकाचे पारितोषिक सुद्धा मिळाले होते. या या नाटकानंतर तिने ‘खामोशी’ आणि ‘पराना’ यासारख्या नाटकांमध्ये अभिनय केलेला होता.
मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असताना असताना इंग्लिश चित्रपट हिंदी मध्ये डबिंग करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये फ्रोझन या इंग्लिश अनिमेटेड चित्रपटाला ‘अॅना’ या पात्राला आवाज देण्याची संधी मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी ‘बिग हिरो 6’ या चित्रपटातील एका पात्राला सुद्धा आवाज दिलेला आहे. मराठी नाटकात अभिनय आणि व्हॉईस आर्टिस्ट म्हणून काम केल्यानंतर प्रियदर्शनीला सोनी मराठी वरील ‘असे माहेर नको ग बाई’ या मराठी मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. सध्या प्रियादर्शिनी ही सोनी मराठी या वाहिनीवरील लोकप्रिय रियालिटी शो ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व-२’ या कार्यक्रमांमध्ये आपल्याला दिसत आहे.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३