संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 07 December 2022

दिनविशेष! लाखो तरुणींना घायाळ करणारा आर.माधवन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

एकेकाळी लाखो तरुणींना घायाळ करणारा अभिनेता आर माधवन यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म १ जून १९७० रोजी झारखंडमधील जमशेदपूर येथे झाला. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असलेल्या माधवन यांचे आज असंख्य चाहते आहेत. दाक्षिणात्य चित्रपटां व्यतिरिक्त माधवन यांनी बॉलिवूडमधील काही चित्रपट केले आहेत. मात्र अभिनेता होण्यापूर्वी माधवन यांनी एका वेगळ्या क्षेत्राचं स्वप्न रंगवलं होतं. त्यांना अभिनेता होण्याऐवजी देशसेवेला वाहून घ्यायचं होतं. माधवन यांचे खरं नाव रंगनाथन माधवन असं असून लोकप्रिय कलाकारांपैकी एक असलेल्या माधवन यांना चाहत्यांनी विविध नावं दिली आहेत. त्यात ‘मॅडी’, ‘मॅडी भाई’, ‘मॅडी पाजी’, ‘मॅडी भाईजान’, ‘मॅडी सर’, ‘मॅडी चेट्टा’, ‘मॅडी अण्णा’ अशी अनेकविध नावाने चाहते त्याला संबोधत असतात.

अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या माधवन यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात कोल्हापूरमध्ये एका शाळेत शिक्षक म्हणून केली होती. त्यानंतर त्याने मुंबईमधील के.सी. कॉलेजमधून पब्लिक स्पीकिंग या विषयात पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण करत असतानाच त्याने त्याचा पोर्टफोलिया करुन एका मॉडलिंग एजन्सीला दिला होता. १९९६ मध्ये माधवन यांनी पहिल्यांदा एका चंदन पावडरच्या जाहिरातीमध्ये काम केलं. या जाहिरातीनंतर त्याने प्रसिद्ध दिग्दर्शक मणि रत्नम यांच्या ‘इरुवर’ या चित्रपटासाठी स्क्रीन टेस्ट दिली. मात्र यावेळी त्यांच्या पदरात अपयश आलं. विशेष म्हणजे मणि रत्नम यांच्या चित्रपटासाठी नाकारण्यात आलेल्या माधवन यांनी पुढील करिअरमध्ये मणि रत्नम यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘गुरू’.

‘इस रात की सुबह नहीं’ हा माधवन यांचा पहिला चित्रपट होतो. त्यानंतर त्यांनी २००१ मध्ये ‘मिनाले’ या दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम केलं. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री रीमा सेनने त्यांच्या सोबत स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर माधवन यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली. चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी माधवन यांनी अनेक मालिकांमध्येही काम केलं होतं. ‘बनेगी अपनी बात’, ‘तोल मोल के बोल’ आणि ‘घर जमाई’ या सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी ‘रंग दे बसंती’, ‘३ इडियट्स’,’ तनु वेड्स मनु’ आणि ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ या चित्रपटामध्ये काम केलं.

संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami