संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 08 August 2022

दिल्लीच्या करोल बागेतील भीषण आगीवर नियंत्रण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – दिल्लीतल्या करोल बाग परिसरातल्या गफर मार्केटमध्ये आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत कोणाचाही मृत्यू झालेला नाही, मात्र आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. दरम्यान, गफर मार्केट इथल्या चप्पलांच्या बाजारात ही आग लागली आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

मिळलेल्या माहितीनुसार, पहाटे सव्वाचार वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या ३९ गाड्या आग विझवण्यासाठी पाठवण्यात आल्या. आगीच्या ज्वाळा दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचल्या होत्या, मात्र शर्थीच्या प्रयत्नांनी ही आग नियंत्रणात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami