नवी दिल्ली – जुन्या दिल्लीतील चांदनी चौकातील भागीरथ पॅलेस मार्केटमधील दुकानांना गुरुवारी रात्री भीषण आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे जवान ४० बंबांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या अग्निशामन मशीनच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. यात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. मात्र कोणतीही जीवित हानी झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
चांदनी चौकातील भागीरथ पॅलेस मार्केटमधील दुकानांना गुरुवारी रात्री ९.१९ वाजण्याच्या सुमारास आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे जवान ४० बंबांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अनेक तास झुंज देऊन आग आटोक्यात आणली. आग विझवण्यासाठी रिमोट कंट्रोल मशीनचा वापर करण्यात आला. या आगीत अनेक दुकानांचे नुकसान झाले. मात्र कोणतीही जीवित हानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.