संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी टास्क फोर्स, फ्लाइंग स्क्वॉडची स्थापना

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या प्रदूषणाची परिस्थिती गंभीर आहे. त्यावर उपाय करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले असून, केंद्राने अंमलबजावणी टास्क फोर्स आणि फ्लाइंग स्क्वॉड तयार केले असून, एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिलीआहे. सर्वोच्च न्यायालयाने २ डिसेंबर रोजी प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आयोग आणि केंद्राने पाच सदस्यीय अंमलबजावणी कार्य दलाची स्थापना केली आहे.

केंद्र सरकारने पाच सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली, ज्याला कायदेमंडळाचे अधिकारही देण्यात आले आहेत. यासोबतच १७ फ्लाइंग स्क्वॉड्सही बनवण्यात आल्या आहेत. एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली. प्रतिज्ञापत्रानुसार, सर्वोच्च न्यायालयाने २ डिसेंबर रोजी प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आयोग आणि केंद्राने पाच सदस्यीय अंमलबजावणी कार्य दलाची स्थापना केली आहे. यानुसार, अंमलबजावणी टास्क फोर्सला शिक्षा करण्याचे आणि प्रदूषणाचा प्रसार रोखण्यासाठी विधायी अधिकार देखील देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे की अंमलबजावणी टास्क फोर्सचे प्रमुख एमएम कुट्टी आणि सीपीसीबीचे अध्यक्ष तन्मय कुमार हे त्याचे सदस्य असतील. याशिवाय, टेरीचे डीजी डॉ. विभा धवन, मध्य प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष एनके शुक्ला आणि डॉ सीएक्यूएम एनजीओ सदस्य आशिष धवन हे देखील टास्क फोर्सचे सदस्य आहेत. केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, १७ फ्लाइंग स्क्वॉड्स देखील तयार करण्यात आली आहेत,येत्या २४ तासात फ्लाइंग स्क्वॉड्सची संख्या ४० पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami