संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

दिल्लीत नव्या संसद भवनात काश्मीरचे गालिचे बसवणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर- काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील खानपूर गावात 50 कारागीर 8 महिन्यांपासून दुहेरी शिफ्टमध्ये 12 रेशमी गालिचे बनवण्याचे काम करत आहेत. हेे 11 बाय 8 चौरस फूट आकाराचे गालिचे नवीन संसद भवनात बसवले जाणार आहेत.

मुख्य विणकर कमर ताहिरी म्हणाले की, डिझाइनद्वारे समृद्ध काश्मिरी वारसा दर्शवला आहे. आमच्यापैकी बहुतेक जण संसदेतच काय, दिल्लीतही गेलेले नाहीत. आता हे गालिचे संसदेत आमचे प्रतिनिधित्व करतील. त्यामुळे आमच्यासाठी ते विशेष आहे. 9 गालिचे बनवण्यात आले आहेत.पुढील तीन आठवड्यात तयार होतील. 15 सप्टेंबर रोजी ते दिल्लीला पाठवले जातील. संसदेसाठी हे कार्पेट कोणत्या किमतीला विकत घेतले जात आहेत हे जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु ते ज्या दर्जाचे आहेत, त्यांची किंमत 50 लाखांपर्यंत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami