नवी दिल्ली- दिल्लीतील गुलाबी बागमध्ये फूटपाथवर उभ्या असलेल्या 3 मुलांना भरधाव कार चिरडल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. या अपघातानंतर एका मुलाची प्रकृती गंभीर आहे.
गुलाबी बाग परिसरात रविवारी सकाळी नऊच्या सुमारास चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार फुटपाथवर चढली आणि या कारने तीन मुलांना जोरदार धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या दोन मुलांची प्रकृती ठिक असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.