नवी दिल्ली – दिल्ली महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराचा तोफा आज थंडावल्या. या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार असून आज शेवटच्या दिवशी प्रचारात उमेदवारांमध्ये प्रचंड चढाओढ पाहायला मिळाली.या निवडणुकीसाठी दिल्ली पोलीस प्रशासन सज्ज झाले असून सात जिल्ह्यांत 30 हजार पोलीस तैनात करण्यात आहेत.
आज या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी दिल्लीत पोहोचले होते.प्रचारादरम्यान त्यांनी सांगितले की, दिल्लीतील नागरिक 4 तारखेची वाट पाहत होते की, आम्ही कधी भाजपला मतदान करु. भाजपने दिल्ली पालिकेत चांगले काम केले आहे. तर दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचार वाढवण्याचे काम केले आहे. त्यांचे मंत्री कारागृहात बंद आहे. त्यामुळे केजरिवाल चिंतित आहेत की, माझे नाव येईल काय.