संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

दिवाळीत एसटीच्या ताफ्यात ११० खासगी बस दाखल होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- प्रवाशांना चांगली आणि आरामदायी सुविधा देण्यासाठी एसटी आपल्या ताब्यात ११० अत्याधुनिक खासगी बस समाविष्ट करणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर या बस महामंडळात दाखल होणार आहेत. मोठ्या आकाराच्या, ऐकपैस जागा आणि आरामदायी या बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. मुंबई ते रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर या मार्गावर त्या चालवण्यात येणार आहेत.
काळाची पावले ओळखून एसटी महामंडळाने ही हायटेक होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्याच्या परिवर्तन बसची जागा नव्या साध्या श्रेणीच्या ५०० कंत्राटी बस घेणार आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर पहिल्या टप्प्यात अशा ११० बस एसटीच्या ताब्यात दाखल होणार आहेत. या बसची मालकी, चालक, डिझेल आणि देखभाल आदी बाबी कंत्राटदारावर सोपवण्यात येणार आहे. साध्या दरात त्या चालवल्या जाणार आहेत. मुंबई ते रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर या मार्गावर या बस धावणार आहेत. पुणे आणि सांगली विभागासाठी प्रत्येकी ६० बसेससाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. वर्षाखेरीस आणखी १२० अशा बस एसटीच्या ताब्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami