संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

दिवाळीनंतर शिधा मिळणार का? शून्य नियोजन, भोंगळ कारभार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : शिधा वाटपात काळाबाजार, बारकाईने लक्ष द्या ! असा सल्ला अजित पवारांनी सरकारला दिला असून, राज्यातील लाखो गोरगरीबांना १०० रुपयांचा शिधा मिळालेला नाही. दिवाळीनंतर शिधा मिळणार का? दिवाळीनंतर हा शिधा मिळून काय फायदा?, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर केली आहे. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना अजूनही चांद्यापासून बांद्यापर्यंत शिधा पोहोचलेला नसल्याचे सांगत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आज पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांनी दिवाळीच्या शिधावाटपात सरकारचे नियोजन शून्य कारभार असल्याची टीका केली. पवार यांनी राज्य सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे लाभार्थींना तातडीने १००रुपयांचा शिधा मिळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अजूनही अनेक भागांमध्ये हा शिधा पोहोचलेलाच नाही. त्यातही कोणत्या रेशनकार्ड धारकांना हा शिधा मिळणार, याबाबतही संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. मध्यमवर्गीयदेखील महागाईच्या चटक्याने होरपळले आहेत. आम्हाला हा शिधा का नाही, असा सवाल मध्यमवर्गीय करत आहेत. ते म्हणाले, जाहीर केलेल्या १०० रुपयांमध्ये शिधा मिळणार आहे, पण त्याच्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे.अजूनही महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळीकडे शिधा पोहोचलेला नाही. तर गरीब आणि मध्यमवर्गीय या सगळ्यांना शिधा मिळाला पाहिजे. पण दिवाळी सण झाल्यावर त्या सवलतीच्या दरामध्ये तो १०० रुपयात मिळून काय त्याचा उपयोग आहे, असे म्हणत, काही ठिकाणी तर केवळ ३ वस्तू तर काही ठिकाणी केवळ २ वस्तू मिळत आहेत. नंतर उर्वरित वस्तू देऊ, असे सांगितले जात आहे. मात्र, दिवाळीनंतर या वस्तू मिळून काय फायदा? तसेच त्याचा काळाबाजार चालला आहे, असे आमच्या कानावर आले असल्याचेही ते म्हणाले. म्हणजे शंभर रुपयांमध्ये मिळणार शिधा कोण २०० ते कोण ३०० रुपयांमध्ये विकत असल्याचा दावाही त्यानी यावेळी केला. हे चुकीचे असून, यामध्ये बारकाईने लक्ष देण्याची नितांत गरज असल्याचे ते म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami