दिवाळी साजरी करा, पण घरात राहुन; राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सणवारांवर निर्बंध लादण्यात आले होते. आता कोरोनाचा संसर्ग कमी असला तरीही खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दिवाळीसाठीही राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, दिपावली घरगुती स्वरुपात साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले असून दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे.

काय आहेत नियम?

१. राज्यातली धार्मिक स्थळे पुन्हा खुली करण्यात आली आहेत. मात्र, तरीदेखील दिपावलीचा उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील, याची दक्षता घेतली जावी.

२. दिपावलीच्या काळाच खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असते. मात्र, नागरिकांनी गर्दी टाळावी. विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी बाहेर पडणे टाळावे.

३. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि करोनाच्या इतर नियमांचं तंतोतंत पालन करावं.

४. दिपावलीच्या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. त्यामुळे वायू आणि ध्वनीप्रदूषणाची पातळी वाढून लोकांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. कोरोना झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भिती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडण्याचं टाळून दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा.

५. दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना परवानगी देतानाच त्यासाठी आवश्यत ती नियमावली देण्यात आली आहे. या नियमावलीचं काटेकोर पालन होईल, याची दक्षता घेण्यात यावी. शक्यतो असे कार्यक्रम ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह अशा माध्यमातून करण्यात यावेत.

६. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम/रक्तदान शिबिरे आयोजित करून त्यातून कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करावी.

Close Bitnami banner
Bitnami