संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 30 January 2023

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय होणार! मुख्यमंत्र्यांचा निर्णय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी मान्यता दिली आहे. देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.

दिव्यांगांसंदर्भात कालच मंत्रालयामध्ये बैठक संपन्न झाली. याच बैठकीमध्ये राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली. आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करून कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.ज्यांना हात नाहीत, पाय नाहीत, चालता-बोलता येत नाही, दिसत नाही त्यांच्यासाठी हा मोठा निर्णय आहे. दिव्यांगांच्या लढ्यामध्ये हे आमचं मोठं यश आहे, अशा भावना आमदार कडूंनी व्यक्त केल्या. या मंत्रालयाची जबाबदारी बच्चू कडू यांच्याकडेच येईल, असं राजकीय जाणकार सांगत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami