मुंबई- ‘पठाण’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.यापूर्वी चित्रपटाच्या व्हीएफएक्सवरून गदारोळ झाला होता. आता ‘बेशरम रंग’ या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने ‘भगवा रंगाचा बिकिनी’ परिधान केल्याने चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पुन्हा एकदा ‘बॉयकॉट पठाण’ ट्रेंडिंग होत आहे.या वादामुळे ‘बेशरम रंग’ या गाण्याचे व्ह्यूज मात्र सातत्याने वाढत असून 41 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्यात दीपिकाचा गाणे चाहत्यांना आकर्षित करत आहे. या गाण्यात दीपिका भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली असून त्यावरून वाद सुरू झाला आहे. भगव्याचा अपमान केल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. भगवा हा हिंदू धर्माचा रंग आहे आणि अशा प्रकारच्या गाण्यात त्याचा वापर अपमानास्पद असल्याचा आरोप करून कट्टरपंथी विरोध करत आहेत.काही ,मंत्र्यांनी चित्रपटावर बंदी आणण्याची महनी करत आहेत. .पण दीपिका पदुकोणला प्रकाश राज यांचा पाठिंबा मिळाला आहे. मनोरंजन करणाऱ्यांच्या कट्टरतावादावर टीका करत कन्नड अभिनेता प्रकाश राज म्हणाले की, हा संताप घृणास्पद आहे. बिकिनी भगव्या रंगाची पाहणारे लोक कलर ब्लाइंड आहेत. तांत्रिकदृष्ट्या दीपिका पदुकोणच्या बिकीनीचा रंग हा केशरी आहे.
अनेक राजकीय पक्ष याला विरोध करत आहेत. तर दुसरीकडे या गाण्यावरही कॉपी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फ्रेंच गीतकाराच्या ‘मेकेबा’ या गाण्यातून या गाण्याचे बीट्स चोरण्यात आल्याची चर्चा आहे. ‘बेशरम रंग’चे संगीत विशाल शेखरने दिले आहे. हे शिल्पा राव आणि कारलिसा मॉन्टेरिया यांनी गायले आहे.शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.