संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

दीवाण हौसिंगच्या कपिल वाधवनसह ७४ जणांवर सीबीआयचे आरोपपत्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- दीवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवन यांच्यासह ७४ जणांच्या विरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. ३४ हजार कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणी सीबीआयने शनिवारी विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले. त्यात धीरज वाधवन आणि हर्षिल मेहता यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे.
देशातील सर्वात मोठ्या ३४ हजार कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणी सीबीआयने डीएचएफएलच्या विरोधात जूनमध्ये गुन्हा दाखल केला होता. १७ बँकांकडून जवळपास ३४ हजार कोटींची कर्जे घेऊन त्यांची परतफेड न करता त्यांनी फसवणूक केली. देशातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा बँक घोटाळा आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने दीवाण हाऊसिंगचे माजी सीएमडी कपिल वाधवन, तत्कालीन व्यवस्थापक धीरज वाधवन आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षिल मेहता यांच्यासह ७४ जणांवर विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. शनिवारी १५ ऑक्टोबरला हे आरोप पत्र दाखल झाले आहे. १७ बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी १८ व्यक्ती आणि ५७ कंपन्यांच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami