संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

दुध दरात सरकारचा हस्तक्षेप नकोच ! शेतकरी संघटनेचे मंत्र्यांना दिले निवेदन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सांगली –

सांगली – राज्यातील काही शेतकरी संघटना सरकारने दुधाला एफआरपी म्हणजेच हमीभाव द्यावा या मागणीसाठी प्रयत्नशील असताना शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आणि रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने मात्र दुधाला एफआरपी लागू करण्यात तीव्र विरोध दर्शविला आहे.सरकारने दुध दरामध्ये हस्तक्षेप करूच नये अशा मागणीचे निवेदन शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी नुकतेच राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे.
शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी सरकार आपल्या या मागणीवर सकारात्मक विचार करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.राज्यातील राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना,सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना आणि कम्युनिस्ट पक्ष संघटनेने सरकारने दुधाची एफआरपी ठरवण्याचा कायदाच करावा अशी जोरदार मागणी मागील काही वर्षांपासून केली आहे.त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तर अलीकडे केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री संजीव बलियान यांची भेट घेतली आहे. सरकारने एफआरपी धोरण लागू केले तर राज्यातील दुध संघाना तोटा दाखवून फरक रकमेची कोट्यवधीची मदत सरकारकडून लाटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.त्यामध्ये दुध उत्पादक शेतकरी आणि शेतमजूर भरडले जाण्याची शक्यता आहे.यासाठी दुध उद्योगातील पुढारी मंडळीचा याला पडद्याआडून पाठिंबा असल्याचे संजय कोले यांनी म्हटले आहे. सरकारने कृश काळात दुध दरात केलेली २ रुपयांची घट केल्याने शेतकरी तोट्यात गेला.त्याचा खर्चही वसूल झाला नाही.मात्र यात मागणी,पुरवठा व बाजारातील स्पर्धा या तत्वानुसार मिळणारा दर दिला तर तो आम्हाला मान्य असेल.त्यामुळे सरकारने एफआरपी कायदा करू नये, सरकारने दुध दर जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पशु संख्या कमी केली आहे.आता जर एफआरपी लागू केली तर दुध उत्पादक पूर्णपणे भरडला जावू शकतो.दुध दरवाढीसाठी आंदोलने करून खासदार मंडळी मात्र त्यासाठी आग्रही आहे हे दुर्दैव म्हणावे लागेल असे संजय कोले यांनी म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami