मुंबई – विधानसभा अध्यक्ष आणि कुलाब्यातील भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत प्रवासी वाहतुक जेटी संदर्भात एक प्रस्ताव मांडला आहे.मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लब दरम्यान दुबई व सॅन फ्रान्सिस्कोमधील मरिनाच्या धर्तीवर प्रवासी वाहतुक जेटी उभारली जावी असे या प्रस्तावात राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.
या प्रस्तावात पुढे असे म्हटले आहे की,देशविदेशातील बहुसंख्य पर्यटक हे मुंबईत येताना आधी गेट वे ऑफ इंडिया आणि नंतर प्रसिद्ध एलिफंटा लेणी, मांडवा आणि जेएनपीटीकडे जातात.मात्र हे पर्यटक बोटीतून उतरत-चढत असताना बराच उशीर लागतो.या सर्वांना किमान अर्धा तास तरी रांगेत तिष्ठत उभे लागते.त्यामुळे याठिकाणी अत्याधुनिक आणि सुसज्ज अशी प्रवासी वाहतुक जेटी उभारणे गरजेचे आहे.या जेटीच्या ठिकाणी जहाजांसाठी इंधन भरण्याची आणि कॅफेटेरियाची सोय असेल. या जेटीची रचना हुबेहुब दुबई आणि सॅन फ्रान्सिस्कोतील मरिनासारखी करता येऊ शकेल असे राहुल नार्वेकर यांनी आपल्या प्रस्तावात मारले आहे.