जयपूर- ओडिशाच्या जयपूरमध्ये दुर्गा पुजेत स्टेजवर गाणे गात असताना प्रसिद्ध गायक मुरली महापात्रा यांचे निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. ४ गाणी गायल्यानंतर ते स्टेजवरच कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. केकेनंतर “लाईव्ह शो’मध्ये संगीत क्षेत्राला बसलेला हा दुसरा हादरा आहे.
ओडिशाचे प्रसिद्ध गायक मुरली महापात्रा यांचा जयपूर शहरातील दुर्गा पूजा मंडपात सोमवारी रात्री गाण्यांचा कार्यक्रम होता. त्यात त्यांनी ४ गाणी सादर केली. त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नंतर ते स्टेजवरच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुरली महापात्रा जयपूर उपजिल्हा कार्यालयात लेखनिक म्हणूनही काम करत होते.