संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

दुहेरीकरणाच्या कामामुळे
कोयना एक्स्प्रेस रद्द

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मिरज: मिरज-पुणे रेल्वे मार्गावर कोरेगाव ते सातारा स्थानकादरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार दि.२८ रोजी धावणारी मुंबई -कोल्हापूर- मुंबई कोयना एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. दुसऱ्या गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहे.
२७ आणि २८ फेब्रुवारी दरम्यान हा बदल केला असल्याची माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली. रेल्वे नं. ११०२९ आणि ११०३० मुंबई – कोल्हापूर – मुंबई कोयना एक्स्प्रेस २८ फेब्रुवारीला रद्द करण्यात आली आहे. २७ फेब्रुवारीला रेल्वे नं. ११०४० गोंदिया – कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस २८ फेब्रुवारीला पुण्यापर्यंतच धावणार आहे. तसेच २८ फेब्रुवारीला रेल्वे नं. ११०३९ कोल्हापूर – गोंदिया एक्स्प्रेस पुण्यावरून तिच्या नेहमीच्या वेळी गोंदियासाठी सुटेल.
२७ फेब्रुवारीला रेल्वे नं. १२७८० हजरत निजामुद्दीन – वास्को गोवा आणि २८ फेब्रुवारीला कोल्हापूर येथून सुटणारी रेल्वे नं. १२१४७ कोल्हापूर – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस दौंड – कुर्डूवाडी – मिरज मार्गे धावेल. ही रेल्वे या दिवशी पुणे – सातारा – कराड आणि सांगली या रेल्वे स्थानकांवर जाणार नाही.तसेच २७ फेब्रुवारीला रेल्वे नं. १६५०८ बंगळुरू – जोधपुर, रेल्वे नं. ११०९८ एर्नाकुलम – पुणे आणि रेल्वे नं. १९६६७ उदयपुर – मैसुर या एक्स्प्रेसदेखील दौंड – कुर्डुवाडी – मिरज मार्गे धावतील, अशी माहिती रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या