संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

देव गेले देवाघरी! ज्येष्ठ अभिनेते रमेश देव काळाच्या पडद्याआड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- आपलं संपूर्ण आयुष्य सिनेसृष्टीसाठी वाहून घेतलेले ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे आज वयाच्या 93 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी सीमा देव, पूत्र अजिंक्य व अभिनय तसेच सुना, नातवंडे असा मोठा परिवर आहे. चित्रपट सृष्टीत नायक, खलनायक, चरित्र अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अशा अनेक भूमिका अगदी सहजपणे साकारणारे रमेश देव हे खर्‍या अर्थाने चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्‍त केले असून उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. 30 जानेवारीला त्यांचा वाढदिवस साजरा झाला होता.

रमेश देव यांनी 285 हिंदी तर 190 मराठी चित्रपटांसह 30 नाटकांमधून काम केले होते. तसेच जवळपास 250 जाहिरातपट त्यांनी काम केले. मनोरंजनाचा असे एकही क्षेत्र नाही की, जिथे रमेश देव यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवलेला नाही. त्यामुळे त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीची फार मोठी हानी झालेली आहे. रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1929 साली कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडिल न्यायाधीश होते. एका न्यायाधिशाचा मुलगा पुढे एक मोठा अभिनेता होईल, असं कोणालाही वाटले नव्हते. रमेश देव यांनी 1951 साली पाटलाची पोर, या मराठी चित्रपटात बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तर आंधळा माघतोय एक डोळा, हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर देव घर, पैशाचा पाऊस, सुवासनी, माझी आई, भाग्य लक्ष्मी, पाठलाग, गुरूकिल्ली, चिमुकला पाहुणा, अशा अनेक मराठी चित्रपटांतून त्यांनी काम केले. तसेच या सुखानु या आणि सर्जा, यासारख्या चित्रपटांची त्यांनी निर्मितीही केली. लालबत्ती काळे बेट यासह 30 नाटकांमध्ये त्यांनी काम केले होते.

आरती चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आणि खिलोना, जीवन मृत्यू, शिकार, कसोटी, घराणा, घर वाली बाहेरवाली, सोनेपे सुहागा, मीस्टर इंडिया, शेर शिवाजी, प्यार किया है प्यार करेंगे, रामकली, फकीरा, सलाखे, दादा आदी 250 हिंदी चित्रपटात काम केले. मात्र ऋषीदांच्या आनंदमध्ये राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या तोडीस तोड त्यांनी डॉ. प्रकाशची जी भूमिका केली. ती अजरामर ठरली. अत्यंत उमेदीच्या काळात त्यांचा चित्रपट सृष्टीत स्ट्रर्ग्ल करित असतानाच त्यांच्या आयुष्यात सीमा देव आल्या आणि त्यानंतर या दोघांनी मागे वळून पाहिलेच नाही. जवळपास 75 चित्रपटांमधून त्यांनी एकत्र काम केले. रमेश देव वयाने थकलेले असले तरी मनाने चिरतरुण होते. वयाच्या 93 वर्षीही ते कधी वृद्ध वाटले नाही, इतका त्यांचा उत्साह दांडगा होता. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami