संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

देशभरातील १३० मेल-एक्सप्रेसना सुपरफास्टचा दर्जा! सर्व श्रेणीत भाडेवाढ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- देशातील १३० मेल-एक्स्प्रेस गाड्यांना भारतीय रेल्वेने सुपरफास्ट गाड्यांचा दर्जा देऊन सर्व श्रेणींमध्ये भाडेवाढ करण्यात आली आहे.‘एसी-१’साठी ७५ रुपये,‘एसी-२, ३ चेअर कार’साठी ४५ रुपये आणि ‘स्लीपर क्लास’साठी ३० रुपये भाडे वाढवण्यात आले आहे.२०२२-२३ या वर्षातील नवीन रेल्वे वेळापत्रकामध्ये रेल्वे विभागाने बहुतांश पॅसेंजर गाड्यांना मेल-एक्स्प्रेसचा दर्जा दिलेला आहे.

रेल्वे तिकीट बुकिंग करताना एसी-१ मध्ये ४५० रुपये, एसी-२ मध्ये २७० रुपये, ३ आणि स्लीपर कोचमध्ये १८० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. ही भाडेवाढ एक ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे. भारतीय रेल्वे ४५ वर्षांपासून ट्रेनचा सरासरी वेग वाढवण्यात अपयशी ठरली आहे.या चार दशकांपासून मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा सरासरी वेग ताशी ५० ते ५८ किमी इतका आहे. ‘खानपान’,सुरक्षा किंवा सुविधांच्या दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.रेल्वेने सर्व वर्गांच्या भाड्यात वाढ केली आहे. रेल्वेने नव्या नियमांनुसार, ताशी सरासरी ५६ किलोमीटर वेगाने धावणार्‍या गाड्यांना आपल्या वेळापत्रकातून सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा दिलेला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami