संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

देशमुखांच्या जामीन अर्जावरील सुनावणीला हायकोर्टाचा नकार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात उच्च न्यायालयाने नकार दिला. दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. त्यामुळे देशमुख यांचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला. ईडीने मनीलॉन्ड्रीग प्रकरणी गेल्यावर्षी अनिल देशमुख यांना अटक केली. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. यापूर्वी त्यांनी जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर ते सातत उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करत आहेत. आतापर्यंत ३ वेळा त्यांचा जामीन अर्ज खंडपीठाने नाकारला. ५ सप्टेंबरला त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायमूर्ती चव्हाण यांनी त्यावर सुनावणी घेण्यास नकार दिला. अन्य खंडपीठाकडे जाण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यामुळे देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम वाढला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami