संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

देशातील सर्वात शक्तिशाली महिला, कंगनाने स्वतःचच केलं कौतुक

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – गेल्या वर्षभरात अभिनेत्री कंगना रनौत तिच्या चित्रपटांपेक्षाही तिने केलेल्या वक्तव्यांमुळे जास्तच चर्चेत आली आहे. विशेषत: तिच्या राजकीय विधानांमुळे तर कंगना अधिकच चर्चेत आणि वादात सापडली आहे. काही दिवसांपूर्वी तिने ‘खलिस्तानी दहशतवाद’बाबत केलेल्या विधानावरून बराच वाद झाल्यानंतर आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा कंगनानं केला आहे. धमकी देणाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याचं कंगनानं सांगितल्यानंतर आता तिनं स्वत:लाच देशातली सर्वात शक्तिशाली महिला म्हणवून घेतलं आहे!

कंगना रनौतनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रोफाईल स्टोरीजमध्ये एक पोस्ट केली आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयात तिच्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेचा संदर्भ देण्यात आला आहे. यासाठी एएनआयनं दिलेल्या एका वृत्ताचं ट्वीट देखील कंगनानं स्टोरीमध्ये दिलं आहे. या ट्वीटमध्ये “देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कंगना रनौतच्या आगामी सर्व सोशल मीडिया पोस्ट सेन्सॉर करण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे”, असं म्हटलं आहे.

कंगनानं या ट्वीटचा फोटो तिची इन्स्टाग्राम स्टोरी म्हणून पोस्ट करत वर “देशातली सर्वात शक्तिशाली महिला” असा मेसेज लिहिला आहे. यापुढे एक मुकुटाचा इमोजी देखील तिने टाकला आहे.

नुकताच कंगनाने आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचा सोशल मीडियाच्या माध्यामातून खुलासा केला आहे. तिने काही दिवसांपूर्वी मुंबई हल्ल्यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती आणि त्यानंतर मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असे तिने यात म्हटलं आहे. तसेच कंगनाने अशा लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. कंगनाने नुकतंच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यातील पहिला फोटोत ती तिच्या आई आणि बहिणीसोबत सुवर्णमंदिरात जात असल्याचे दिसत आहे. तर पुढील फोटो हे संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याप्रकरणी आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami