संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

देशातील १ लाख लोकांच्या सोन्याचा होणार लिलाव

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अनेकजण सोने गहाण ठेवून कर्ज घेतात. सोन्याच्या दागिन्यांवर किंमतीच्या ७० टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाते. यात कर्जदाराला तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. मात्र वेळेवर हे कर्ज फेडता आले नाही, तर कर्जदाराचे सोने विकून कर्ज वसूल केले जाते. अशाचप्रकारे एनबीएफसी (नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनी) आणि सोने कर्ज देणाऱ्या बँका बुधवारी कर्जदारांच्या सोन्याचा लिलाव करणार आहेत. मुथुट फायनान्स आणि मणप्पुरम फायनान्स यांच्याकडून सर्वाधिक सोन्यावर कर्ज घेण्यात आले आहे.

या महिन्यात जवळपास १८ शहरांमध्ये लिलावाच्या ५९ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जानेवारी, २०२० म्हणजेच कोरोनाच्या आधी देशातील व्यवसायिक बँकांचा एकूण सोने कर्ज आकार २९,३५५ कोटी रुपये होता. त्यात अडीच पटीने वाढ होऊन दोन वर्षांत ७०,८७१ कोटींचा आकडा पार केला आहे.

कोरोनामुळे देशातील ६० टक्के जनतेच्या उत्पन्नात घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक लोकांनी सोने गहाण ठेवून कर्ज घेतले, पण त्यांना ते फेडता आले नाही. आता देशातील अशा १ लाख लोकांच्या सोन्याचा लिलाव होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami