संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

देशातील २ कोटी शेतकर्‍यांना किसान सन्मानचे पैसे परत करण्याच्या नोटिसा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र नसतानाही या योजनेचा लाभ घेतल्याचा दावा करत सरकारने आता अशा तब्बल २ कोटी शेतकऱ्यांकडून प्रशासनाने रकमेची वसूली सुरू केली आहे.त्यांना हे पैसे परत करण्यासाठी नोटिसा पाठवल्या असल्याचा आरोप विरोधी कॉंग्रेस पक्षाने केला आहे.
कॉंग्रेसचे प्रवक्ते अखिलेश प्रताप सिंग यांनी यासंदर्भात म्हटले आहे की,२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती.शेतकर्‍यांच्या खात्यात हे पैसे जमा देखील केले होते.परंतु या लाभास पात्र नसतानाही अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे सरकारी यंत्रणांच्या निदर्शनास आल्याचा दावा केंद्र सरकारने करत अशा शेतकर्‍यांची यादी तयार करण्यात आली आहे.ही यादी देशातील सर्व जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आली आहे.प्रशासनाने अशा शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून लाभ घेतलेली रक्कम परत करण्याचे आवाहन केले.या शेतकर्‍यांनी हे पैसे बर्‍या बोलाणे परत केले नाहीत ते त्यांच्या बँक खात्यातून वळवून वसूल केले जातील असा इशारा केंद्र सरकारने या २ कोटी शेतकर्‍यांना या नोटीसद्वारे दिला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami