संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

देशातील ८ राज्यांत १५ जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – देशात मान्सूनचे आगमन झाले आहे. काही ठिकाणी पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. मात्र, दुसरीकडे काही ठिकाणी अद्यापही उष्णतेची लाट असल्याचे दिसत आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या काही भागात १५ जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सध्या देशाची राजधानी दिल्लीत तापमानाचा पारा हा ४३ .८ अंश सेल्सिअसवर आहे. २५ जूनपर्यंत उष्णतेपासून कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तसेच येत्या काही दिवसांत दिल्लीत गडगडाटी वादळे, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी आकाश ढगाळ राहणार आहे, तर काही ठिकाणी पाववसाचा अंदाजदेखील वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, १५ जूनपर्यंत उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. १६ जून ते २२ जूनदरम्यान कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी किंवा सामान्यच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. १६ जून ते २२ जून दरम्यान देशातील कोणत्याही भागात उष्णतेची लाट अपेक्षित नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami