मुंबई : संपूर्ण विश्वाला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. परंतु, त्यांच्या आवाजाने त्या आजही प्रत्येकच्या हृदयात घर करून आहेत. आजही त्यांची सोशल मीडियावर त्यांच्या आवाजाचे त्यांच्या साधेपणाचे एकूणच त्यांची गाणी आणि सुमधुर आवाजावर चर्चा रंगत असल्याचे पहायला मिळते. अशावेळी त्यांची भाची राधा मंगेशकर यांनी केलेले विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.
२४ जून रोजी इंदूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या राधा मंगेशकर यांनी शास्त्रीय संगिताविषयी एक धक्कादायक विधान केलं. यावेळी त्या म्हणाल्या, “सध्याच्या काळात लोक शास्त्रीय संगीत ऐकत नाहीत. देशात केवळ १ टक्का लोक आहेत जे शास्त्रीय संगीत ऐकतात. त्यामुळे जे चाहत्यांना ऐकायला आवडतं, तेच मीदेखील गाते. शास्त्रीय गायकीमधून लोकांचा रस कमी झाला आहे. मला सुगम संगीत गाण्यात आनंद आहे”, असे राधा मंगेशकर म्हणाल्या. यामुळे मात्र त्यांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इतकंच नाही तर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना ट्रोलही केलं आहे. दरम्यान, लता मंगेशकर यांच्या विषयीदेखील राधा यांना काही प्रश्न विचारण्यात आले. मात्र, याविषयी भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. राधा मंगेशकर या संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या कन्या. राधा मंगेशकर यांनी केलेलं हे वक्तव्य २४ तारखेच्या एक दिवस आधी पत्रकारांशी संवाद साधताना केलं होतं. त्यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना ट्रोल केलं आहे.