नवी दिल्ली – भारतात दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच १० हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात देशात कोरोना विषाणूचे ८ हजार १३ नवे रुग्ण आढळले असून ११९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच काल १६ हजार ७६५ लोक कोरोनातून बरे झाले. यापूर्वी गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी ९ हजार १९५ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.
देशात कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ४ कोटी २९ लाख २४ हजार १३० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ५ लाख १३ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत ४ कोटी २३ लाख लोक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात एकूण १ लाख २ हजार ६०१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत देशभरात कोरोना लसीचे १७७ कोटी ५० लाख ८६ हजार डोस देण्यात आले असून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार, आतापर्यंत सुमारे ७७ कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत.