नवी दिल्ली – शेअर बाजारात विक्रीचा सपाटा असल्याने आज दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक लावून बाजार घसरणीसह उघडला. सेन्सेक्स ३७८ अंकांच्या घसरणीसह ५२,१५३ वर सुरू झाला, तर निफ्टी १२६ अंकाच्या घसरणीसह १५,५१२ वर उघडला. सकाळी ९.५० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये ५१०.६७ अंकांची घसरण झाली होती, तो ५२,०२१.१० अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टीमध्ये १६२.३५ अंकांची घसरण झाली होती. निफ्टी १५,४७६.४५ अंकांवर व्यवहार करत होता. ही घसरण पुढे आणखी वाढली. सकाळी १०.२६ वाजता सेन्सेक्स ५२३ अंकांनी घसरून ५२,००८ वर आणि निफ्टी १७५ अंकांनी घसरून १५,४६३ वर आला होता.
यापूर्वी मंगळवारी शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीत होता. मेटल आणि आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली होती. दिवसाच्या शेवटी सेन्सेक्स ९३४.२३ अंकांच्या म्हणजेच १.८१ टक्क्यांच्या वाढीसह ५२,५३२.०७ वर बंद झाला होता, तर निफ्टी २८८.६५ अंकांच्या म्हणजेच १.८८ टक्क्यांच्या वाढीसह १५,६३८.८० वर बंद झाला होता.