- पेटीचा दर ९ हजार रुपये
नवी मुंबई – अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आंबा म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटू लागते.हा आंबा खाण्यासाठी खरे तर मे महिन्यापर्यंत वाट पाहावी लागते.मात्र आता ती प्रतीक्षा संपली आहे.कारण हापूस आंब्याच्या ३८ पेट्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत.या पेटीचा ४ ते ९ हजार रुपये इतका असल्याची माहिती एपीएमसी फळ विभागाचे संचालक संजय पानसरे यांनी दिली.
संजय पानसरे यांनी सांगितले की, वाशीच्या एपीएमसी बाजारात गुरुवारी रत्नागिरी हापूस आंब्याच्या तब्बल ३८ पेट्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारात तुरळक पेट्या दाखल होत होत्या.गुरुवारी यंदाच्या हंगामातील हापूसची अधिक आवक झाली आहे.बाजारात आंब्याची ही आतापर्यंतची चांगली आवक आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बाजारात दोन डझन हापुसची पाहिली पेटी दाखल झाली होती.त्यावेळी दोन डझनाला ९ हजार रुपयांचा भाव मिळाला होता.गुरुवारी दाखल झालेल्या हापूसच्या ऐका पेटीतील ४ ते ८ डझनला ५ हजार ते १० हजार रुपये बाजार भाव मिळाला असून, पिकलेल्या हापूसच्या पेटीला १२ ते १५ हजार रुपयांचा दर मिळाला आहे.
दरम्यान, या फळ बाजारातील व्यापारी अशोक हांडे यांनी सांगितले की, यंदा दोन महिने आधीच हापूस बाजारात दाखल झाला आहे.देवगडच्या प्रशांत शिंदे आणि देवेश शिंदे दोन डझन आंबे शुक्रवारी बाजारात पाठवले. ही दोन डझनची हापूस पेटी ९ हजारांत विकली गेली.बाजारातील सध्याचा हापूसचा किरकोळ दर प्रतिकिलो ४०० ते ५०० रुपये असा आहे.रायगड, कर्नाटकातून हे आंबे येत आहेत.