संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

द्वेषपूर्ण गुन्ह्याकडे दुर्लक्ष कराल तर एक दिवस तुमचीही तशी गत होईल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- द्वेषपूर्ण गुन्ह्याकडे दुर्लक्ष कराल तर ती वेळ तुमच्यावरही येऊ शकते.मुळात भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात धार्मिक आधारावर हेट क्राइम म्हणजेच द्वेषपूर्ण गुन्हा करण्यास बिलकुल स्थान नाही,अशा शब्दात काल सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिस प्रशासनाला चांगलेच फटकारले.२०२१ मध्ये नोएडातील ६२ वर्षीय काझीम अहमद शेरवाणी हे हेट क्राइमला बळी पडले होते. याप्रकरणी सुनावणी करताना न्यायमूर्ती के एम जोसेफ यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने ही टिप्पणी केली.

हेट क्राईम अथवा हेट स्पीचच्या वाढत्या प्रकरणांविषयी सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे.ही सुनावणी सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालली. न्यायालय म्हणाले की, राज्याने अभद्र भाषेची समस्या मान्य केली तरच तिच्यावर तोडगा काढता येतो.तरीही हेट क्राइम ओळखले जाणार की ते दडपण्याचा प्रयत्न केला जाणार? हा द्वेषाचा गुन्हा आहे. तुम्ही ते कार्पेटखाली दाबून टाकणार का? असा सवालही न्यायालयाने पोलिसांना केला.एखादा व्यक्ती पोलिसांकडे आला व मी टोपी घातल्यामुळे माझी दाढी खेचून शिवीगाळ करण्यात आली असे म्हणाला.तरीही त्याची दखल न घेता गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर ही एक समस्या आहे.अशा पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे.पोलिस ठाण्यात येणाऱ्यांच्या मनात गुन्हेगाराची भावना निर्माण होता कामा नये,असे न्यायालय म्हणाले.तुम्ही अशा द्वेषपूर्ण दुर्लक्ष कराल तर तशी एक वेळ तुमच्यावरही येऊ शकते.

२०२१ मध्ये ६२ वर्षीय व्यक्तीने आपल्या याचिकेत आरोप केला होता की, ४ जुलै रोजी तो नोएडाच्या सेक्टर ३७ मध्ये अलीगडला जाणाऱ्या बसची वाट पाहत होता. तेव्हा काही लोकांनी त्यांना लिफ्ट देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर त्यांनी मुस्लिम असल्यामुळे त्याला मारहाण करत शिवीगाळ केली. पीडित नोएडाच्या सेक्टर ३७ मध्ये एका पोलिस ठाण्यात गेला.तिथे वरीष्ठ पोलिस अधिकारी नव्हते.केवळ कॉन्स्टेबल उपस्थित होता.त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या