संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

धनंजय मुंडेंच्या रॅलीप्रकरणी
समर्थकावर गुन्हा दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

परळी- आजारातून बरे झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचे परळी मतदारसंघामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. पण उशिरापर्यंत मिरवणूक आणि सभा घेणे चांगलेच भोवले आहे. धनंजय मुंडेंचे समर्थक वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय मुंडे यांची‎ मिरवणूक आणि सभेसाठी पोलिसांनी‎ रात्री दहा वाजेपर्यंत‎ परवानगी दिली होती. मात्र रात्री‎ ११.५५ पर्यंत मिरवणूक सभा‎ चालल्याने कायद्याचे उल्लंघन झाल्या प्रकरणी‎ परळी शहर पोलीस ठाण्यात कार्यक्रमाचे आयोजक‎ वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे. धंनजय मुंडे हे रविवारी परळी‎ शहरात येणार असल्याने त्यांचे‎ स्वागत मिरवणूक व सभेसाठी‎ स्पीकर वाजवण्यासाठी पोलिसांनी‎ सायंकाळ पाच ते दहा‎ वाजेपर्यंत परवानगी दिली होती.‎ परंतु धंनजय मुंडे यांची‎ स्वागत सभा रात्री ११.५५ पर्यंत‎ चालली होती. त्यामुळे पोलिसांनी‎ दिलेल्या परवानगीचे उल्लंघन‎ झाल्या प्रकरणी पोलीस अंमलदार‎ विष्णू फड यांनी परळी शहर‎ ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून‎ कार्यक्रमाचे आयोजन वाल्मिक‎ कराड यांच्यावर गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे.‎

आजचे हवामान
ताज्या बातम्या